म. टा. वृत्तसेवा
हजार मेंढ्यांचे नेतृत्व सिंह करतो तेव्हा त्या हजार मेंढ्या सिंहासारख्या असतात. मात्र, हजार सिंहांचे नेतृत्व एक मेंढी करते तेव्हा ते हजार सिंह मेंढ्यांसारखे वागतात. दुदेर्वाने, आपल्या देशाचेही असेच काहीसे झाले आहे. याला कारण म्हणजे, आपल्याकडे भक्कम नसलेले नेतृत्व, असे परखड मत राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी व्यक्त केले. वाशी येथील साहित्य मंदीर सभागृहात सजेर्राव कुइगडे लिखित 'मुंबई २६/११ एक हादसा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
देशाचे नेतृत्व हे शिवाजी महाराजांसारखे असावे. पुण्यातील जर्मन बेकरीतील स्फोट, अक्षरधामवरील हल्ला, ओरिसामधील नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या लुटलेल्या रायफली, १९४८ मध्ये ६ हजार पाकिस्तान्यांनी केलेली घुसखोरी आदी घटना आमच्या देशात घडल्या. तरी आजही आमची तयारी चालूच आहे. देशाचे दुदेर्व म्हणजे, आम्ही आताही जागे झालेलो नाही, कारण आजही आपण या घटना गांभीर्याने घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आपण पोलिसांना नेहमी सुधारा, असे म्हणतो. नेत्यांनी आधी सुधरावे, म्हणजे पोलीस आपोआप सुधारतील. माणूस जेवढा मोठा होत जातो तेवढा तो कायद्याची पायमल्ली जास्त करतो, असे इनामदार यांनी नमूद केले. पाश्चात्य देशात केलेल्या चुकांची मांडणी केली जाते, त्यामुळे पुढच्या वेळी त्या चुका टाळण्यास मदत होते. मात्र, आपण केलेल्या चुकांची मांडणी केली जात नाही आणि त्याच चुकांची पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सजेर्राव कुइगडे, साहित्य संस्कृती मंडळाचे कार्यवाह सुभाष कुळकणीर् आदींसह नवी मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
|
No comments:
Post a Comment