Wednesday, April 28, 2010

LOKMAT Review

देशाला भक्कम नेतृत्व नाही - इनामदार
(27-04-2010 : 8:34:21)

नवी मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) - हजार मेंढ्यांचे नेतृत्व जेव्हा सिह करतो, तेव्हा त्या हजार मेंढ्या सिहासारख्या असतात. मात्र हजार सिहांचे नेतृत्व जेव्हा एक मेंढी करते, तेव्हा ते हजार सिह मेढ्यांसारखे वागतात. दुर्दैवाने आपल्या देशाचेही काहीसे असेच झाले आहे. कारण आपल्याकडे भक्कम नसलेले नेतृत्व, असे परखड मत राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविद इनामदार यांनी व्यक्त केले.
वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात शनिवारी सर्जेराव कुइगडे लिखित 'मुंबई २६/११ एक हादसा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी इनामदार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकासाठी त्यांनी प्रस्तावना लिहिली असून प्रस्तावनेत त्यांनी देशातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला आहे. या देशाचे नेतृत्व कसे असावे याबाबत बोलताना इनामदार म्हणाले की, देशाचे नेतृत्व हे शिवाजी महाराजांसारखे असावे. पुण्यातील जर्मन बेकरीतील स्फोट, अक्षरधामवरील हल्ला, ओरिसामधील नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या लुटलेल्या रायफली, १९४८ मध्ये ६ हजार पाकिस्तान्यांनी केलेली घुसखोरी आदी घटना आमच्या देशात घडल्या. तरी आजही आमची तयारी चालूच आहे, देशाचे दुर्दैव म्हणजे आम्ही आताही जागे झालेलो नाही, कारण आजही आपण या घटना गांभीर्याने घेतल्या गेलेल्या नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांना आपण नेहमी सुधारा, असे म्हणतो. या देशातील नेत्यांना आधी सुधारा, मग पोलीस आपोआप सुधारतील. कारण माणूस जेवढा मोठा तेवढा कायद्याची पायमल्ली जास्त करत असल्याकडे इनामदार यांनी लक्ष वेधले. पाश्चात्त्य देशात केलेल्या चुकांची मांडणी केली जाते, त्यामुळे पुढच्या वेळी त्या चुका टाळण्यास मदत होत. मात्र आपण केलेल्या चुकांची मांडणी केली जात नाही आणि त्याच चुकांची पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सी.बा. अडसूळ व त्यांच्या पत्नी शारदा अडसूळ, डॉ. पल्लडवाड, पुस्तकाचे लेखक सर्जेराव कुइगडे, मंडळाचे कार्यवाह सुभाष कुळकर्णी आदी मान्यवरांसह नवी मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, April 27, 2010

DNA News Paper review on book

Under Navi Mumbai Tab, on 5th Page

http://epaper.dnaindia.com/epapermain.aspx?queryed=20&eddate=4%2f25%2f2010


Book on Nov 26 attacks released

DNA Correspondent. Vashi

Marathi Sahitya Sanskruti Kala Mandal will become the medium to relive the horrors of 26/11 terror attack. A function to release the book 'Mumbai 26/11 Ek Hadsa' by Sarjerao Kuigade was organised by the mandal on April 24 at its auditorium in sector 6, Vashi. The 128-page book was released by Ex-DGP Arvind Inamdar who has also written the foreword. The book attempts to cover all aspects involving the attack- the mannerism it was held, the action and flaws noted by the police etc. The writer Kuigade also spoke and narrated the purpose of penning the book.


Maharashtra Times Review on this book

New Taken from Below link:


चुकांची पुनरावृत्ती होतच आहे

28 Apr 2010, 0337 hrs IST
Publish Post
प्रिंट मेल Discuss शेअर सेव प्रतिक्रियाफॉन्ट:
म. टा. वृत्तसेवा


हजार मेंढ्यांचे नेतृत्व सिंह करतो तेव्हा त्या हजार मेंढ्या सिंहासारख्या असतात. मात्र, हजार सिंहांचे नेतृत्व एक मेंढी करते तेव्हा ते हजार सिंह मेंढ्यांसारखे वागतात. दुदेर्वाने, आपल्या देशाचेही असेच काहीसे झाले आहे. याला कारण म्हणजे, आपल्याकडे भक्कम नसलेले नेतृत्व, असे परखड मत राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी व्यक्त केले. वाशी येथील साहित्य मंदीर सभागृहात सजेर्राव कुइगडे लिखित 'मुंबई २६/११ एक हादसा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

देशाचे नेतृत्व हे शिवाजी महाराजांसारखे असावे. पुण्यातील जर्मन बेकरीतील स्फोट, अक्षरधामवरील हल्ला, ओरिसामधील नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या लुटलेल्या रायफली, १९४८ मध्ये ६ हजार पाकिस्तान्यांनी केलेली घुसखोरी आदी घटना आमच्या देशात घडल्या. तरी आजही आमची तयारी चालूच आहे. देशाचे दुदेर्व म्हणजे, आम्ही आताही जागे झालेलो नाही, कारण आजही आपण या घटना गांभीर्याने घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आपण पोलिसांना नेहमी सुधारा, असे म्हणतो. नेत्यांनी आधी सुधरावे, म्हणजे पोलीस आपोआप सुधारतील. माणूस जेवढा मोठा होत जातो तेवढा तो कायद्याची पायमल्ली जास्त करतो, असे इनामदार यांनी नमूद केले. पाश्चात्य देशात केलेल्या चुकांची मांडणी केली जाते, त्यामुळे पुढच्या वेळी त्या चुका टाळण्यास मदत होते. मात्र, आपण केलेल्या चुकांची मांडणी केली जात नाही आणि त्याच चुकांची पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सजेर्राव कुइगडे, साहित्य संस्कृती मंडळाचे कार्यवाह सुभाष कुळकणीर् आदींसह नवी मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Monday, April 26, 2010

Friday, April 23, 2010

Mumbai 26/11 attacks - Police Story 1 ---

December 07, 2008Interview with retired Police DG Mr.Arvind Inamdar, who unveils the true picture of police, politics, government and the whole system. The Interview is in Five Parts.


I am filling proud that the book has a foreword by Police DG Mr.Arvind Inamdar. He is chief Guest
in my book publication ceremony.

Wednesday, April 21, 2010

भस्मासुराची फॅक्टरी :कुमार केतकर


रविवार, २२ नोव्हेंबर २००९
कुमार केतकर

‘२६/११’ सारखे हल्ले पुन्हा होऊ शकतील? वस्तुस्थिती ही आहे की, पाकिस्तान नष्ट करूनही जगातील दहशतवाद नाहीसा होणार नाही. कारण आता जगाला भेडसावणाऱ्या दहशतवादाचे स्वरूप जागतिक आहे आणि आता तर दहशतवाद्यांच्या संघटनांचे स्वरूप ‘कॉर्पोरेट’ झाले आहे. ‘२६/११’ चे एक केंद्र मध्यपूर्व आशियात म्हणजे इस्राएल-पॅलेस्टिन पट्टय़ातही असू शकते. त्यामुळे इस्राएल-पॅलेस्टिन प्रश्नावर, त्याचप्रमाणे अफगाणिस्तान आणि इराक येथील यादवींवर सामोपचाराने तोडगा निघत नाही, तोपर्यंत दहशतवादाचा धोका कायमच राहील..
मुंबईवर आणखी एखादा असाच थरारक आणि हिंस्र दहशतवादी हल्ला होऊ शकेल का? एखाद्या लोकप्रिय वा ज्येष्ठ राजकीय नेत्याची हत्या शक्य आहे का? संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवून आठ वर्षे होत आली आहेत. अशाच एखाद्या राष्ट्रीय वास्तूवर आकस्मिक हल्ला होण्याची शक्यता किती आहे? ..असे प्रश्न अनेकांच्या मनात भुतासारखे भिरभिरत असतात. त्यातून इतरही संभाव्य प्रश्न निर्माण केले जातात. अणुकेंद्रावर, तेलाच्या रिफायनरीवर, संरक्षण खात्याच्या कचेरीवर जर एकदम असा हल्ला झालाच, तर त्याचा ‘बदला’ म्हणून वा ‘कायमची कटकट’ मिटवून टाकण्यासाठी भारत थेट पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारेल का? त्या युद्धाचे परिणाम काय होऊ शकतील? वगैरे वगैरे.
आपल्याकडे काही ‘तज्ज्ञ’ मंडळी अशीही आहेत की, ती म्हणतात- आणखी एखादा दहशतवादी हल्ला व्हायची वाट पाहायची गरज नाही, पाकिस्तान नकाशावरून कायमचाच नष्ट करायला हवा, भले भारताला कितीही किंमत द्यावी लागो!
या सर्व चर्चेमध्ये असे गृहित धरलेले असते की, दहशतवादी हल्ले फक्त (वा मुख्यत:) पाकिस्तानच घडवून आणते. दुसरे गृहितक असे की, दहशतवादी हे ‘इस्लाम’च्या रक्षणासाठी (वा इस्लामी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी) असे हल्ले घडवून आणतात.
पहिली गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती ही की, गेल्या १० वर्षात दहशतवाद्यांनी जेवढे हल्ले खुद्द पाकिस्तानातच घडवून आणले आहेत, तेवढे भारतात घडवून आणलेले नाहीत. लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा किमान पाच वेळा त्यांच्या खुनाचे प्रयत्न झाले आणि त्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्यांचे सुरक्षासैनिक मरण पावले. बेनझीर भुत्तोंच्या हत्येला पुढील महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. या दोन वर्षात तर जवळजवळ प्रत्येक आठवडय़ाला एक या प्रमाणात दहशतवादी हल्ले पाकिस्तानात झाले आहेत. मुशर्रफ यांना त्यांच्या कारकीर्दीत दहशतवाद्यांनी कब्जा केलेल्या लाल मशिदीवर करावी लागलेली लष्करी चढाई तर सर्वानाच आठवत असेल. त्यानंतर आजपर्यंत पोलीस कचेऱ्या, लष्करी ठाणी, पंचतारांकित हॉटेल्स, आयएसआयची ऑफिसेस, राजदूतावास, विद्यापीठ अशा कुठल्याही ठिकाणी हल्ले करून दहशतवाद्यांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना बेजार करून टाकले आहे. अध्यक्ष झरदारींवर थेट हल्ला करण्याचे दोन प्रयत्न फसले आहेत.
म्हणजेच भारताने काही करण्याऐवजी दहशतवादीच पाकिस्तान उद्ध्वस्त करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी ‘इंडिया टुडे’ या साप्ताहिकाने ‘पाकिस्तान वाचेल का?’ अशा अर्थाची कव्हर स्टोरी प्रसिद्ध केली होती. त्यात पाकिस्तान झपाटय़ाने विघटनाच्या मार्गाने जात असल्याचे म्हटले होते. बलुचिस्तान तर धुमसतोच आहे आणि तालिबान्यांनी त्यांच्या तोफा-बंदुका आता पाकिस्तानच्या राजवटीवरच रोखल्या आहेत.
मुद्दा हा की, भारताने युद्ध करून त्यातून काहीही साध्य होणार नाही. उलट त्या युद्धाचे निमित्त होऊन पाकिस्तानी लष्कर, दहशतवादी गट आणि राजकीय पक्ष यांची एकच फळी उभी होऊन भारताला अधिकच धोका निर्माण होईल. आज स्वत:चे घर आणि जीव वाचवता- वाचवतानाच त्या सर्वाचा धीर सुटत चालला आहे!
तरीही सुरुवातीला उपस्थित केलेले प्रश्न भेडसावत राहणारच आहेत- गेल्या वर्षीच्या २६ नोव्हेंबरसारखे आणखी काही हल्ले भारतात होण्याची शक्यता आहे का?, हा तर सर्वाच्या मनातला कळीचा प्रश्न. या प्रश्नाचे सरळ आणि स्पष्ट उत्तर हे आहे की, दहशतवादी हल्ल्यांचा धोका भारताला तर आहेच, पण जगातील बऱ्याच देशांना आहे. दहशतवादाचे भूत कायमचे गाडले जाण्याची शक्यता किमान पुढील २५-३० वर्षे नाही. दहशतवादाचे एक केंद्र म्हणजे पाकिस्तान. तो नष्ट झाला तरीही हा भस्मासुर आटोक्यात येण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात नाही. कारण या भस्मासुराचे आता अनेक अवतार निर्माण झाले आहेत. या भस्मासुरांच्या कॉर्पोरेट कंपन्या झाल्या आहेत. त्यांना प्रचंड प्रमाणावर, उघड व गुप्तपणे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत आहे. ठिकठिकाणचे तरुण ‘मानवी बॉम्ब’ व्हायला वा दहशतवादी फौजेत सामील व्हायला तयार होत आहेत.
पाकिस्तान-अफगाणिस्तानचा पट्टा जरी सर्वात प्रक्षोभक भासत असला, तरी आता लिबिया, इराक, इराण, सुदान, इजिप्त अशा अनेक ठिकाणी दहशतवादी गट निर्माण होत आहेत. अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणाऱ्या १९ दहशतवाद्यांपैकी १५ जण सौदी होते. (इराकी व अफगाण कुणीच नव्हते.)
या सर्व संहारक अस्वस्थतेचा केंद्रबिंदू इस्राएल- पॅलेस्टिन या पट्टय़ात, स्वाभाविकच मध्यपूर्व आशियातील अरब राष्ट्रात आणि पर्यायाने पाकिस्तान- अफगाणिस्तान या भागात आहे. या सर्व विध्वंसक स्थितीला केवळ पाकिस्तान जबाबदार नाही. अमेरिका आणि तितक्याच वा त्याहूनही जास्त प्रमाणात इस्राएल यांनी या भस्मासूरांना जन्माला घातले आहे. शीतयुद्ध अगदी टोकाला गेलेले असताना १९७९ साली ही ‘भस्मासुरांची फॅक्टरी’ निर्माण झाली.
व्हिएतनाम युद्धात दारूण पराभव झालेली अमेरिका आपले जागतिक प्रभुत्त्व पुन्हा कसे प्रस्थापित करता येईल, याचा विचार करीत होती. अमेरिकाच इस्राएलचा तारणहार असल्याने इस्राएलही भयग्रस्त झाले होते. इस्राएलला भौगोलिक वेढा असलेल्या सर्व देशांशी सोविएत युनियनचे मैत्रीचे (व लष्करी मदतीचे) संबंध होते.
युद्धात जिंकलो नाही, पण तहांमध्ये तरी आपण आघाडीवर राहावे, अशी परराष्ट्रनीती स्वीकारून १९७८-७९ साली अमेरिकेने इस्राएल व इजिप्त या दोन देशात शांतता करार करून घेतला. तेव्हा इजिप्तचे अध्यक्ष होते अन्वर सादत. गमाल अब्देल नासेर यांच्या नावाने जगभर परिचित असलेला इजिप्त हा अमेरिकाविरोधी आणि सोविएत युनियनचा मित्र मानला जात असे. परंतु इजिप्तच्याच सादत यांनी इस्राएलबरोबर शांतता करार केला आणि तोही अमेरिकेच्या आशीर्वादाने झाल्यामुळे एकूणच अरब देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातून इस्राएलने त्यांचा अरब आणि इस्लामविरोध अजिबातच मवाळ केला नाही आणि त्यामुळे शांतता करारानंतर वातावरण अधिकच कलुषित होत गेले. राष्ट्रीय संचलनाच्या वेळेस एका इजिप्तच्या सैनिकाने थेट सादत यांनाच लक्ष्य करून ठार केले. इजिप्त-इस्राएल मैत्री करारावर पुन्हा सावट आले. तेव्हापासून अमेरिकेने इस्राएलच्या सर्व आक्रमक धोरणांना अधिकाधिक पाठिंबा द्यायला सुरुवात केली.
त्याच सुमाराला आणखी तीन घटना घडल्या, की ज्यामुळे दहशतवाद आणि राजकारण हे जोडले गेले- ते अगदी आजपर्यंत. पहिली घटना म्हणजे अमेरिकेने पाळलेली, पोसलेली आणि जपलेली इराणच्या शहांची राजवट उलथून टाकून तेथे शिया इस्लामिक क्रांती झाली. आयातोला खोमेनींनी सत्तेची सूत्रे हाती घेताच घोषणा केली की, अमेरिका व इस्राएल या दोन सैतानी राजवटी नष्ट केल्याशिवाय जगाला स्वास्थ्य प्रश्नप्त होणार नाही. दुसरी घटना म्हणजे त्याच वर्षी सोविएत फौजा अफगाणिस्तानात घुसल्या आणि त्यांनी त्या भागातील अमेरिकन प्रभावाला आव्हान दिले. तिसरी घटना म्हणजे इराणच्या राजधानीत तेहेरान येथे तेथील इस्लामी विद्यार्थी क्रांतिकारकांनी अमेरिकन दूतावासातील लोकांना ओलीस ठेवून ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनांमुळे अमेरिकेतील राजकारण अधिकच उजव्या बाजूला व युद्धखोरीकडे झुकू लागले. १९८० च्या अध्यक्षीय निवडणुकीत मवाळ अध्यक्ष जिमी कार्टर यांचा पराभव होऊन जहाल उजव्या विचारांचे रोनाल्ड रिगन निवडून आले. त्याच सुमाराला पाकिस्तानमध्ये लष्करशहा झिया-ऊल-हक यांनी आपली सत्तेवरची पकड अधिक घट्ट केली होती. (१९७७ साली पदच्युत केलेले झुल्फिकार अली भुत्तो यांना ‘लष्करी’ न्यायालयाने ४ एप्रिल १९७९ रोजी फाशी दिले.) झिया यांना अर्थातच अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा होता- आर्थिक, राजकीय आणि लष्करी.
पाकिस्तानची इस्लामी राजवट आता अमेरिकेला सोविएत युनियनच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये, खोमेनीच्या विरोधात इराणमध्ये आणि इंदिरा गांधींच्या विरोधात भारतात वापरायची होती. खलिस्तानी दहशतवाद हा १९८० ते १९८७ या काळातच फोफावला. त्यांनी सुवर्णमंदिरावर कब्जा केला, तेथूनच त्यांना स्वतंत्र खलिस्तानची घोषणा करायची होती, पण इंदिरा गांधींनी त्यांचा तो कट उधळून लावला.
या सर्व पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला अमेरिकेने पोसलेले होते. शीतयुद्धाच्या काळात स्वत:चे वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने तीन राजकीय तळ उभे केले होते- पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि इस्राएल.
पाकिस्तानची मदत घेऊन अफगाणिस्तानात इस्लामी धर्मवाद अमेरिकेनेच वाढविला. सौदी अरेबियाची मदत घेऊन एका बाजूला इराणला व दुसऱ्या बाजूला इराकला शह दिला आणि इस्राएलला सर्व प्रकारचे सहाय्य करून अरब देशांवर वचक ठेवला. परंतु, सत्तेच्या शतरंजवरील मोहरे असे खेळवून त्या देशांमधली जनता आटोक्यात राहतेच असे नाही.
इस्राएल हा अमेरिकेच्या पाठिंब्यावरच मध्यपूर्व आशियात मुजोरी करतो, पॅलेस्टिनी जनतेवर अत्याचार करतो आणि लेबेनॉनमध्ये घुसून आपली दहशत बसवतो हे सर्व अरब-मुस्लिम देशांना दिसत होते. जोपर्यंत अमेरिका-इस्राएल आणि अमेरिका-पाकिस्तान त्याचप्रमाणे अमेरिका-सौदी यांचे नेटवर्क उधळले जात नाही, तोपर्यंत जगात शांतता नांदणे शक्य नाही. इस्राएलच्या आजूबाजूच्या सर्व अरब-मुस्लिम देशांमधील जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदतो आहे. त्यातूनच दहशतवादी निर्माण होत आहेत. त्यांचा शत्रू केवळ भारत नाही, तर जो कुणी त्यांच्या दृष्टिकोनातून इस्राएलचा मित्र असेल, तो त्यांचा शत्रू आहे. कारण पॅलेस्टिनला त्यांची भूमी परत मिळू नये, त्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण होऊ नये म्हणून इस्राएलने अमेरिकेच्या मदतीने सर्वत्र राजकीय सुरुंग पेरून ठेवलेले आहेत. ते सुरुंग उधळण्यासाठी या सर्व प्रदेशात जे तरुण आघाडीवर येत आहेत, ते हे नव-दहशतवादी आहेत.
ते कुठच्याही विशिष्ट देशासाठी लढत नाहीत. खरे म्हणजे ते धर्मासाठी लढतात, असेही म्हणण्यासारखी स्थिती नाही. कारण अमेरिकेला वश होणाऱ्या सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. अमेरिका-इंग्लंड-इस्राएल यांचा प्रभुत्ववाद उधळण्यासाठी ते लढत असले तरी आता हा भस्मासुर त्यांच्याही संघटनेच्या कक्षा ओलांडून पुढे गेला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेला गर्दचा व्यापार, शस्त्रास्त्रांचा बेफाम काळाबाजार आणि दहशतवाद्यांच्या टोळ्या एकत्र आल्या आहेत. आता दहशतवाद हा एक ‘मल्टिनॅशनल कॉर्पोरेट बिझिनेस’ झाला आहे. म्हणूनच तथाकथित इस्लामी-तालिबानी दहशतवादी पाकिस्तानवर वा त्या त्या भागातील मुस्लिम लोकांवरही हिंस्र हल्ले करीत आहेत.
या सर्व धुमश्चक्रीत हा भस्मासुर आपल्यावरच उलटला तर आकाराने अगदी लहान असलेला इस्राएल केव्हाच नष्ट होईल, ही भीती त्या देशाला आहे. ‘मोसाद’ या त्यांच्या कारस्थानी (व क्रूर) हेरखात्याचा जन्म या भस्मासुराला वेसण घालण्यासाठीच असला तरी त्या ‘भस्मासुराची फॅक्टरी’च वर म्हटल्याप्रमाणे अमेरिका-इस्राएल यांच्या संयुक्त राजकारणातून निर्माण झाली आहे.
सीआयए या अमेरिकन गुप्तहेर संघटनेविषयी आपण नेहमी ऐकत असतो. कट-कारस्थाने, खून-हत्याकांड असे कोणतेही मार्ग अनुसरून अमेरिकेला अनुकूल असे सत्तापालट घडवून आणणारी हेरसंस्था म्हणून सीआयएची (कु) ख्याती आहे.
सीआयएच्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक ‘कारवायां’बद्दल चर्चा असे. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना पैसे पुरविणे, विचारवंतांना/ प्रश्नध्यापक वर्गाला विविध आमिषांनी वश करून घेणे, कामगार पुढारी हाताशी धरून ट्रेड युनियन चळवळीत हस्तक्षेप करणे असले उद्योगही सीआयए करीत असते. कम्युनिस्ट रशियाची केजीबी ही हेरसंस्थाही असेच धंदे करण्यात माहीर होती. या दोन हेरसंस्थांविषयी प्रचंड प्रमाणावर ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. बऱ्याच (माजी) गुप्तहेरांनी त्यांच्या कुटिल-कपटी आठवणीही लिहिल्या आहेत. परंतु तुलनेने ‘मोसाद’ या इस्राएली गुप्तहेर संस्थेविषयी फारच कमी माहिती उपलब्ध असते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीएसटी स्टेशन, ताज, ट्रायडंट-ओबेरॉय, कामा हॉस्पिटल, लिओपाल्ड कॅफे यांच्याबरोबर नरिमन हाऊस या इमारतीवरही हल्ला झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. ‘छबाद हाऊस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत इस्राएली ज्यूंनी धर्माच्या आवरणाखाली ‘मोसाद’चे केंद्र चालविले आहे, अशी ‘अल कायदा’ची माहिती होती, असे सांगितले जाते.
‘मोसाद’चे ते मुंबईतील केंद्र उडवून टाकण्याचे आदेश पाकिस्तानातील ‘अल् कायदा’च्या दहशतवादी पथकांना मिळाले होते. काही हेरतज्ज्ञ तर असेही मानतात की, रेल्वे स्टेशन, ताज वगैरेंवरचे हल्ले हे भारतीय गुप्तहेरांची दिशाभूल करण्यासाठी केले गेले. त्यांचे खरे लक्ष्य होते, नरिमन हाऊस ऊर्फ छबाद हाऊस.
म्हणजेच जगातील काही ‘इस्लामी’ दहशतवाद्यांचे युद्ध मुख्यत: इस्राएलशी आहे आणि त्याचे मूळ इस्राएलच्या आक्रमक धोरणांमध्ये आहे. अमेरिकेचे आर्थिक व लष्करी पाठबळ नसेल तर इस्राएल हा देश एक दिवसही अस्तित्वात राहू शकणार नाही, असे ‘अल् कायदा’चे संघटक मानतात. साहजिकच, जो देश वा जी संस्था इस्राएलच्या आक्रमक हेतूंना मदत करते, ते सर्व इस्लामी जिहादींचे शत्रू आहेत. त्यामुळे पाकिस्तान ‘नष्ट’ करूनही जगातील दहशतवाद नाहीसा होणार नाही. जोपर्यंत इस्राएल-पॅलेस्टिन प्रश्नावर सामोपचाराने तोडगा निघणार नाही, तोपर्यंत दहशतवादाचा धोका जगाला भेडसावत राहील. ‘२६/११’ पासून आपणही हा बोध घ्यायला हवा.
डबल एजंट?
दाऊद गिलानी ऊर्फ डेव्हिड कोलमन हेडली आणि त्याचा सहकारी तहव्वुर राणा हे दोघेजण अमेरिकन पासपोर्टवर भारतात आले. त्यांनी अनेक शहरांना भेटी दिल्या. नेमक्या ज्या ज्या ठिकाणी हेडली राहिला, त्याच्या जवळपासच दहशतवाद्यांनी भीषण हल्ले केले. त्याच भागात त्यांनी त्यांचे नेटवर्क उभे केले. गेली किमान वर्ष-दीड वर्ष अमेरिकन गुप्तहेर खाते हेडलीच्या हालचालींवर नजर ठेवून होते. परंतु ही माहितीसुद्धा भारतीय हेर व पोलीस खात्याकडे अमेरिकेकडूनच आली आहे. त्यामुळे ती माहिती पूर्ण असेलच असे नाही. शिवाय त्यात अमेरिकेने हेही स्पष्ट केलेले नाही, की हेडलीचा संशय त्यांना नक्की कशामुळे, केव्हा आणि कसा आला.
कुणी अशीही शंका व्यक्त करू शकेल की हेडली हा ‘सीआयए’चाच ‘डबल एजंट’ कशावरून नव्हता? किंवा पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चाही ‘डबल एजंट’ तो कशावरून नसेल? पाकिस्तानी नागरिक आपले मुस्लिम नाव बदलून ख्रिश्चन नाव धारण करतो, पाकिस्तानी नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व घेतो आणि पासपोर्टही अमेरिकेतून प्रश्नप्त करतो हे सर्व सीआयए आणि एफबीायच्या माहितीशिवाय (खरे म्हणजे संगनमताशिवाय) शक्य नाही. अमेरिकेला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ‘इमिग्रेशन अ‍ॅण्ड नॅचरलायझेशन’ खात्यामार्फत जाताना अनेक वेळा किती अपमान वा जाच सहन करावा लागतो, हे बऱ्याच जणांना माहीत आहे. शिवाय मूळ मुस्लिम, त्यातूनही पाकिस्तानी वा अरब माणूस ‘मोसाद’ या इस्राएल गुप्तहेर संस्थेच्या नजरेतून सुटेल, हे संभवत नाही. ‘मोसाद’ फक्त इस्राएलच्या हितसंबंधांकडे पाहात नाही, तर अमेरिकेत अशा रीतीने येणाऱ्या सर्वावर नजर ठेवते. हेडलीने पुण्याच्या ज्यू वस्तीवर आणि मुंबईच्या ‘छबाद हाऊस’वर विशेष नजर ठेवली होती, हे आता उघडकीस आले आहेच. तो ‘मोसाद’चा डबल एजंटही असू शकतो!

Panic at Taj after 9-yr-old’s prank

News Taken from Mumbai Mirror


Panic at Taj after 9-yr-old’s prank

26/11-fixated child calls up the hotel to warn them of a blow up. Alert staff goes into security overdrive...What follows is a near-comical whodunnit

By Preety Acharya
Posted On Wednesday, April 21, 2010 at 06:09:37 AM

A prank call by a nine-year-old fixated by images of 26/11 sent staff at Taj Mahal Hotel into security overdrive, bringing back uneasy memories of a time they have been trying to forget.



The son of a senior ONGC (Oil and Natural Gas Commission) officer based in Jorhat, Assam, called the front desk of the hotel at 8.30 pm on April 8, and in his best-adult impersonation warned the hotel of an impending bomb attack. The hotel, the boy claimed, would be blown up by 10 pm.

With just an hour-and-a-half to go for this supposed deadline, the alert staff, not wishing to take any chances, activated all possible security measures.

The Colaba police was informed, a team from the bomb-disposal squad was rushed to the hotel and the entire tower was sweep-searched, revealed a senior police officer, not wishing to be quoted.


Access to the hotel was blocked during this time. When few minutes after 10 nothing untoward happened, the hotel staff located the number from where the call had been received through caller -ID and gave it to the police. Assistant police inspector Lata Sutar of Colaba police station was put in charge of further investigation.

The call was traced to a landline number in the ONGC colony at Cinnamara, Jorhat. While a Mumbai police team was dispatched to Assam, Jorhat police was also alerted, and they tracked down the caller in the early hours of April 9.

The number was traced to senior ONGC engineer Satish Kumar who had been posted in Mumbai three years ago. Last year, Satish Kumar admitted he, his wife, and their nine-year-old son had stayed at the Taj. "When the police reached the house, the engineer said he had no clue about any call being made from his house but after some time he casually mentioned that his son, a class III student, was fascinated by the television images of 26/11, and that he had picked up one of the cards of the hotel from the front desk," disclosed an officer.

The boy was questioned and soon he admitted to having called up the hotel ‘just like that’.

He was chastised and the father of the boy wrote a note apologising for his son’s action, saying that the events around 26/11 had left a deep impact on the child. No further action was taken either by the hotel staff or the police. Despite repeated attempts, the hotel remained unavailable for comments.



Thursday, April 15, 2010

About The Book "Mumbai 26-11 EK HAADSA"

Mumbai 26-11 EK HAADSA

On 26-11-2008 ten fidayeen terrorists sponsored by and coming in from Pakistan attacked Mumbai. They took 196 innocent lives and injured 308 persons. Within no time, our police force started their counter attack. The police officers were ill informed and not equipped with proper weapons, as a result our topmost police officers and policemen lost their lives. However they caught hold of one terrorist named Ajamal Kasab.

One book written in Marathi language by Shri .Sarjerao Kuigade on this issue is being published on 24-4-2010. For which features this book can be remembered?

The writer says, the terror attack of 26-11, rocked the whole nation. We woke for a while; we saw the terror on the screen of television, showed our anger, went to Gate way of India to light candles in memory of innocent people who lost their lives in the attack and our Jawans who threw their lives to save them. We went back to our homes and went to sleep again. We forgot everything we saw, read and experienced during the terror attack. This is Indian phenomenon. We are not in a habit of writing history, reading it and taking lessons from it. We are not aware of the fact that, if we are least concerned about history, then history repeats. Exactly that happened when there was bomb blast at German Bakery in Pune. What we learned from the past experience? Nothing!

This is the same thing written by Sarjerao Kuigade in his book called “MUMBAI 26-11 EK HAADSA’. The book has a foreword by shri.Arvind Inamdar ex Director General of police. Maharashtra State.

Sarjerao Kuigade has elaborated the whole incident of 26-11-2008 like a movie reeling before our eyes. He does not stop there. He raises certain questions and answers them. He pinpoints that the politics of ballot boxes by the ruling party is responsible for diluting stringent provisions in the Pota act; which gave strength to the terrorists.

The writer focuses all angles relating to terror acts. The various methods used by terrorists, their training programs, Pakistan’s hand in promoting terrorism, list of movies in English and Hindi on terrorism, various books on terrorism in English , renowned Women terrorists in the world.

He speaks about lapses of state government and central government, lack of coordination between various security agencies and secret agencies. He gives details e.g. dates and number of deaths in each of previous terror attacks in India.

He discusses the role of media in connection with the 26-11 terror attack, effects on minds of children who saw live telecast of the terror attack, ineffectiveness of News broadcasters association, Prime minister’s declaration regarding formation of National Investigation Agency.

Finally, the writer salutes police men, Jawans of various security agencies, fire brigade jawans, officers of bomb detection and defusing squad, doctors, nurses, common men like Vijay Surve who helped the security agencies in their combat against terrorism.

The salient feature of this book is the form of narration used by the writer. The whole story is narrated by five senior citizens who met every day at the top of one hill in the vicinity of Navi Mumbai. There is no doubt that the book will be widely read .

Wednesday, April 14, 2010

26/11 – the country’s fastest terror attacks trial

The following New is in Mumbai Mirror

26/11 – the country’s fastest terror attacks trial

In stark contrast to earlier cases that dragged on for years, this one took just 271 working days to complete

MUMBAI MIRROR BUREAU



In what is the country’s fastest terror attacks trial, the special court, which will pronounce the verdict in the 26/11 Mumbai attacks case on May 3, has recorded 3,192 pages of evidence as deposed by 653 witnesses, in just 271 working days – a stark contrast to the previous terror trials that dragged on for years.
The trial against Pakistani terrorist Mohammad Ajmal Qasab and his Indian co-accused Fahim Ansari and Sabahuddin Shaikh began on April 15 last year in the special court at Arthur Road Jail.
Other than working overtime to tackle the mammoth trial’s papers and procedures, the court also worked during Diwali and summer vacations when even the Bombay High Court is shut.
While 296 witnesses deposed in person, 357
witnesses’ affidavits were tendered as evidence. Other than 3,192 pages of evidence – mainly comprising witness testimonies – the prosecution presented 1,015 articles (materials seized or recovered during investigations) and 1,691 exhibits (various documents supporting the arguments).
The transcripts, presented as evidence, of the terrorists’ conversations with their Pakistani handlers totalled 413 pages.
The 26/11 trial’s fast-paced proceedings is in stark contrast to another of the city’s epic trials: the 1993 serial blasts trial against 123 accused, which took 14 years to complete.
Bearing in mind the colossal amount of work in gleaning through thousands of pages of evidence, special 26/11 judge M L Tahaliyani even sought extra help from the administrative departments of the Sessions Court in the form of two more persons to assist the nine staff members.

TRIAL BY NUMBERS
April 15, 2009: The day the trial began in the special court 3,192: Number of pages it took to record the evidence 653: The number of witnesses who deposed 413: The number of pages of transcripts of terrorists’ conversations with Pak handlers 1,015: The number of articles (materials seized or recovered during investigations) 1,691: The number of exhibits (various documents supporting the arguments) 271: The number of working days that the trial took 1,611: Questions asked to Qasab while recording his statement 29: Pages of Ajmal Qasab’s plea of guilt

Wednesday, April 7, 2010

Mumbai 26/11 Ek Hadsa

waiting for "Mumbai 26/11 Ek Hadsa"