6 मे
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी मोहम्मद अजमल कसाबला अखेर आज फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे.
विशेष कोर्टाचे न्यायाधीश एम. एल. ताहिलियानी यांनी ही शिक्षा सुनावली.
कोर्टाने कसाबला अनेक नागरिकांची हत्या तसेच देशाविरुद्ध युद्ध पुकारणे अशा 4 गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली. तर वेगवेगळ्या 5 गुन्ह्यांमध्ये त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे.
पाकिस्तानात कट रचून मुंबईवर हल्ला करणे, तसेच 166 लोकांची हत्या करणे, याला जबाबदार धरून कसाबला फाशीची शिक्षा दिली गेली.
तसेच कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईत जे मृत्यूचे थैमान घातले, त्या दहशतवादी कृत्यांसाठी त्याला फाशी सुनावण्यात आली.
याशिवाय भारताशी युद्ध पुकारण्याच्या गुन्ह्याबद्दलही त्याला फाशी सुनावण्यात आली.
याशिवाय वेगवेगळ्या 32 गुन्ह्यांमध्ये त्याला वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत.
8 मे 2009मध्ये या खटल्यातील पहिला साक्षीदार तपासला गेला. त्यानंतर एका वर्षाच्या आत 600हून जास्त साक्षीदार तपासण्यात आले.
यापूर्वी कुठल्याही आरोपीला एवढी मोठी शिक्षा झालेली नाही


